शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या पार्श्भूमीवर डॉ. हर्षल माने (पाटील) यांच्या संकल्पनेतून अल्पदरात फवारणी पंप वाटप
८० % समाजकारण आणि २०% राजकारण हे वंदनीय शिवसेनाप्रमुखांचे विचार जोपासत पारोळा येथे माजी मुख्यमंत्री तथा पक्ष प्रमुख, शिवसेना, उद्धव ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभुमीवर इलेक्ट्रिक फवारणी पंप अल्पदरात वाटप करण्यात येत आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने (पाटील) यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना दि. १२ ते दि २७ जुलै २०२३ पर्यंत अल्पदरात फवारणी पंप वाटप करण्यात येणार आहे.
या योजनेचा एरंडोल, पारोळा, भडगाव येथील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ हर्षल माने यांनी केले आहे.
वाटप प्रसंगी पारोळा तालुका प्रमुख प्रा. आर. बी. पाटील, शहर प्रमुख अशोक मराठे, उप तालुका प्रमुख दादा पाटील, विभाग प्रमुख दिलीप चौधरी , अरूण चौधरी, उपतालुका प्रमुख बाळासाहेब पाटील, उपशहर प्रमुख भुषण भोई, अल्पसंख्यांक तालुका प्रमुख कलीम शेख, सोशल मिडिया प्रमुख सावन शिंपी, शिवदुत अमोल पाटील, युवासेना जिल्हा समन्वयक आबा महाजन, युवा सेना तालुका प्रमुख रवि पाटील, युवासेना उपतालुका प्रमुख दिपक पाटील, युवा शहर प्रमुख सनी लोहार, कट्टर शिवसैनिक लखन वाणी, सोमनाथ देशमुख शेठ, भरत चौधरी, व पारोळा एरंडोल भडगाव मतदार संघातील पदाधिकारी व सर्व जेष्ठ श्रेष्ठ शेतकरी बांधव उपस्थित होते.